मनविसेने केली एमकेसीएलच्या कार्यालयाची तोडफोड

June 26, 2009 1:51 PM0 commentsViews: 6

26 जून11 वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बंद पडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना म्हणजे मनविसेच्या कार्यकर्त्यांनी एमकेसीएलच्या कार्यालयाची तोडफोड केली. वेबसाईटशी संबंधित अधिकारी कामचुकारपणा करत असल्याचा आरोप मनविसेचे प्रवक्ते अजिंक्य नाईक यांनी केला आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच सर्व्हर डाऊन झाल्याचे प्रकार घडले आणि अचानक ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट बंद पडली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा खेळखंडोबा झाला. परिणामी मनविसेने कायदा हाती घेतला. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत अनेक अडचणी होत्या, त्या मनविसेने संबंधित अधिकार्‍यांना भेटून निदर्शनास आणूनही दिल्या होत्या. पण त्यावर त्या अधिकार्‍यांनी काहीच उपाययोजना केली नसल्याचं मत साईनाथ दुर्गे यांनी नोंदवलं आहे. ते मनविसेचे ऑनलाईन ऍडमिशन प्रमुख आहेत. ऑन लाईन ऍडमिशन प्रक्रियेसाठी राज्य सरकारने 1400 सेंटरवर ऑनलाईन ऍडमिशनची सोय केली होती. पण सर्व्हर डाऊन असल्याने केंद्रावरच्या कर्मचार्‍यांच्याही कामांचा गोंधळ झाला. ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेबाबत तुमचे काय अनुभव आहेत, किंवा काही तक्रार असल्यास तुम्ही 'आयबीएन लोकमतशी ' पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता. संपर्क : 9930360406

close