कोकण पॅकेजचा संदर्भ विधानसभा निवडणुकांशी नाही – अशोक चव्हाण

June 27, 2009 8:00 AM0 commentsViews: 2

27 जून, रत्नागिरी कोकणला राज्यसरकारने जाहीर केलेल्या 5हजार 232 कोटींच्या पॅकेजचा संदर्भ विधानसभा निवडणुकांशी नाही, असं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिलंय. कोटींचं पॅकेज जाहीर कोकणातल्या मतदारांना विधानसभा निवडणुकीपूर्वी आघाडी सरकारने दाखवलेली ही लालूच आहे, अशी ओरड सत्ताधा-यांमधून होत आहे. तिला उत्तर देताना अशोक चव्हाण यांनी ' लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. तर विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. आणि त्यामध्ये हा निर्णय झालेला आहे, असं त्यांनी म्हटलंय.खरं तर कोकणाला जाहीर केलेल्या पॅकेजचा निधी हा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधीच मिळायला हवा. पण पॅकेजचा निधी निवडणुकीच्याआचारसंहितेपूर्वी मिळण्याची शक्यता नसल्याचं, सत्ताधारी आमदारांनीच कबूल केलं आहे. ' पॅकेज मार्फत जर आम्हाला पैसा मिळणार असेल तर त्याचं आम्ही स्वागतच करू. परंतु या निवडणुकीची आचारसंहिता बघता पॅकेजच्या माध्यमातून मिळणार-या निधीचे पैसे हे दोन महिन्यांच्या आत आम्हाला मिळतील असं काही वाटत नाही. म्हणूनच पॅकेजच्या अंमलबजावणीसाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत, ' अशी प्रतिक्रिया कोकणातले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उदय सामंत यांनी दिली आहे. सत्ताधारी आमदारांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया पाहता कोटी रुपयांचं भलं मोठं कोकण पॅकेज राज्य सरकारकडून जाहीर करून घेण्यात नारायण राणे यशस्वी झाले असले तरी पॅकेजचा फायदा कोकणातल्या जनतेला किती होणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पॅकेज जाहीर करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे परिणाम विधानसभा निवडणुकीपूर्वी दिसले नाहीत, तर विरोधकांच्या हातात आयतं कोलीत दिल्यासारखंच होणार आहे.

close