हिंमत असेल तर अविश्वास ठराव मांडा -खडसे

November 25, 2014 5:02 PM0 commentsViews:

khadse_on_chavan_345325 नोव्हेंबर : विश्वासदर्शक ठरावावरुन पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. हिंमत असेल तर हिवाळी अधिवेशनात अविश्वास ठराव मांडा असं आव्हान महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी काँग्रेसला दिले आहे. तसंच काँग्रेसचे पाच-सहा आमदार रोज आपल्या संपर्कात असतात असा खुलासाही खडसेंनी केली.

राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन भाजप सरकार तरले पण आवाजी मतदान प्रक्रियेत भाजपने बहुमत सिद्ध केल्यामुळे नेमका कुणाचा पाठिंबा घेतला यावरचा पडदा उठू शकला नाही. त्यामुळे काँग्रेसने भाजप सरकारच्या विरोधात थंड थोपटले आहे. आमच्या 15 आमदारांना निलंबित करण्याचा भाजपचा डाव आहे. त्यामुळे अगोदर पाच आमदारांना निलंबित करण्यात आलंय. मतविभाजनाच्या वेळी आमदारांची संख्या कमी असावी असा भाजपचा हेतू असून कृत्रिम बहुमत भाजपने सिद्ध केलंय अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला खडसेंनी प्रत्युत्तर दिलंय. हिंमत असेल तर डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यात काँग्रेसने अविश्वास ठराव पहिल्याच दिवशी मांडावा आणि मतविभाजनाची मागणी करावी आम्ही बहुमत सिद्ध करण्यास तयार आहोत असं आव्हान खडसेंनी दिलं. तसंच काँग्रेसलाच आमदार फुटण्याची भीती आहे. रोज काँग्रेसचे पाच-सहा आमदार माझ्या केबिनमध्ये बसलेले असतात. त्यामुळे त्यांना हीच भीती आहे की, गुप्त मतदान झालं तर निम्मे आमदार फुटतील म्हणून काँग्रेसची केवीलवाणी धडपड सुरू आहे असा टोलाही खडसेंनी लगावला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close