ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्युजेसच्या डोक्याला दुखापत, ICUमध्ये दाखल

November 25, 2014 4:59 PM0 commentsViews:

Phillip Hughes injury25 नोव्हेंबर : क्रिकेट म्हणजे जेन्टलमन लोकांचा खेळ पण काळाच्या पडद्याआड हा खेळ अधिक आक्रमक झालाय. दक्षिण ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन फिल ह्युजेस याला एका मॅचमध्ये बॉल लागून गंभीर डोक्याला गंभीर दुखापत झालीय. फिल ह्युजेसला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे.

सिडनीत सुरू असलेल्या साऊथ ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यू साऊथ वेल्स सामन्यात फिल 63 वर बॅटिंग करत होता. सीन ऍबोटनं त्याला
बाऊंसर टाकत आऊट केलं. पण हा बॉल सरळ त्याच्या डोक्यात लागला आणि तो खाली कोसळला. त्याला सीपीआर देऊन शुद्धीत आणावं लागलं. त्याची प्रकृती गंभीर असल्याने लगेच हेलिकॉप्टर बोलवून त्याला मैदानातूनच थेट हॉस्पिटलला नेण्यात आलं. या बॉलमुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय. त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. या घटनेनंतर ही मॅच ताबडतोब रद्द करण्यात आली. काही दिवसातच भारत-ऑस्ट्रेलिया सीरिज सुरू होतेय. या सीरिजमध्ये स्थान मिळावं, यासाठी फिलचे प्रयत्न सुरू होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close