लग्नाचा हट्ट धरणार्‍या प्रेयसीला प्रियकराने जाळले

November 25, 2014 9:19 PM0 commentsViews:

nanded_gf_kill25 नोव्हेंबर : लग्नाची मागणी करणार्‍या एका अल्पवयीन मुलीला तिच्याच प्रियकराने पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडलाय. पीडित मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्या आलंय. तर मुख्य आरोपी फराज शेखला उमरी पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

उमरी तालुक्यातील फराज शेख या तरूणाचे एका 17 वर्षांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. फराजनं लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंधही ठेवले होते, असा मुलीच्या नातेवाईकांचा आरोप आहे. त्यामुळेच ही मुलगी ‘लग्न कर’ असा वारंवार हट्ट करत होती. त्या हट्टाला वैतागून फराजनं चक्क त्या मुलीला पेट्रोल टाकून पेटवून दिलं. पीडित मुलीवर सध्या नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close