भुईमुगावरून खडसे-ठाकरेंमध्ये शाब्दिक युद्ध

November 25, 2014 11:43 PM1 commentViews:

uddhav_on_khadse25 नोव्हेंबर : खडसे काल अजित पवारांची भाषा बोलत होते आणि आज शरद पवारांसारखे बोलत आहे असं प्रत्युत्तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ खडसे यांना दिलं. भुईमुगाच्या शेंगा कुठे लागो पण त्याला पाणी मिळो आणि शेतकर्‍यांचे पिक कर्ज माफ होवो असा टोलाही त्यांनी खडसेंना लगावला. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

‘मोबाईल बिल भरतात मग वीजबिल का भरत नाही’ अशी खिल्ली महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शेतकर्‍यांची उडवली होती. त्यांच्या विधानावर सर्वच स्तरातून टीका झाली. मोठ्या कष्टाने सत्ता मिळाली आहे असा उद्दामपणा कराल तर अजित पवार होईल अशी परखड टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला खडसेंनी आपल्या स्टाईलने उत्तर दिलं. मी शेतकर्‍याचा मुलगा असून शेतकर्‍यांचं दु:ख मला चांगलं माहित आहे. ज्यांना भुईमुगाच्या शेंगा कुठे येतात हे माहित नसेल तर बोलू नये असा पलटवार खडसेंनी केला होता. आज उद्धव ठाकरे औरंगाबादेत होते. यावेळी त्यांनी खडसेंच्या विधानाचा समाचार घेतला. एकनाथ खडसे काल अजित पवारांची भाषा बोलत होते त्यामुळे त्यांच्यावर तशी टीका केली होती. पण आज त्यांनी सारवासारव करून शरद पवारांसारखे बोलत आहे अशी तुलनाच उद्धव यांनी केली. खडसे म्हणतात, भुईमुगाच्या शेंगा कुठे येतात ?, तर भुईमुंगाच्या शेंगा कुठेही लागो पण त्याला पाणी मिळो आणि शेतकर्‍यांचे पिक कर्ज माफ होवो असा टोला उद्धव यांनी खडसेंना लगावला. तसंच शरद पवारांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्यावर रताळे कुठे येतात अशी टीका केली होती त्यांच्या भाषेत मीही टीका करू शकतो पण तसं बोलणार नाही अशी आठवणही उद्धव यांनी करून दिली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Siddheshwar Kadam

    जे काय फंड्स दिले जातात ते शेतकर्‍या पर्यन्त पोहचत नाहीत !

close