एमकेसीएल कार्यालय तोडफोड : मनविसेच्या 10 कार्यकर्त्यांना अटक

June 27, 2009 9:32 AM0 commentsViews: 5

27 जून, मुंबई एमकेसीएलच्या कार्यालयाची तोडफोड करणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना म्हणजेच मनविसेच्या दहा कार्यकर्त्यांना 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. शुक्रवारी रात्री आझाद मैदान पोलिसांनी उशीराने त्या कार्यकर्त्यांना अटक केली. शुक्रवारी ऑनलाईन ऍडमिशन प्रक्रिया सर्व्हर डाऊन झाल्यामुळे 4 तास थांबली होती. त्यापूर्वी ऑनलाईन ऍडमिशनबाबतच्या त्रुटी मनविसेच्या कार्यकर्त्यांनी एमकेसीएलच्या निदर्शनास आणल्या होत्या. पण त्याकडे दुर्लक्ष केल्याचं मनविसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. वेळीच लक्ष दिलं असतं तर विद्यार्थ्यांच्या वेळेचा खेळखंडोबा झाला नसता, असंही कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं.

close