26 /11चा हल्ला आम्ही विसरलो नाही, मोदींनी पाकला सुनावले

November 26, 2014 12:47 PM0 commentsViews:

modi_on261126 नोव्हेंबर : मुंबईवर झालेला 26/11 चा दहशतवादी हल्ला आम्ही अजूनही विसरलेलो नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सुनावले. तसंच भारत दक्षिण आशियाचं नेतृत्व करायला सक्षम असल्याचं ठामपणे सांगितलं. सर्वांनी मिळून दहशतवादाचा सामना करायला हवा, असं मत मोदींनी मांडलं. नेपाळमध्ये सार्क शिखर परिषदेला सुरुवात झाली यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारपासून नेपाळ दौर्‍यावर आहे. काल दोन्ही देशांमध्ये 3 करारांवर सह्या झाल्या. आज काठमांडूत सार्क शिखर परिषदेचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आशियाई देशांत परस्पर संबंध दृढ करण्यावर भर दिला.तर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दक्षिण आशियाई देशांतले वाद मिटायला हवेत असं मत मांडलं. परस्परांशी लढण्यापेक्षा गरिबीशी लढायला हवा, असं ते म्हणाले. पण सार्कच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आलेल्या या दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हात मिळवणं टाळलं.

नरेंद्र मोदींनी सार्कच्या शिखर परिषदेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे-

भारतानेचं सार्कचं प्रतिनिधीत्व करणं गरजेचं आहे आणि ते आम्ही नक्की करू
भारत यापुढे मेडिकल व्हिसा देणार
 मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला आम्ही अजिबात विसरू शकत नाही.
दक्षिण आशियाई देशांमध्ये सीमेवरती व्यापाराच्या सुविधा वाढायला हव्यात.
नेपाळ आणि भूटान या देशांबरोबर भारताने आपला व्यापार वाढवला आहे.
टीबी,एचआयव्ही यांसारख्या रोगांवर एकत्र येऊन लढा देणं गरजेचं आहे. – दहशतवादाशी सामना करण्याची गरज
द. आशियाई देशांमधले वाद कमी करण्याची गरज,दहशतवादाशी एकत्र येऊन लढण्याची गरज

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26/11बद्दल ट्विट केलंय, पंतप्रधान म्हणतात, “2008 साली आजच्या तारखेला मुंबईवर जो भयानक हल्ला झाला, त्याचं आज आम्ही स्मरण करतो. ज्या निष्पाप महिला आणि पुरुषांनी यात आपले जीव गमावले त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहतो. त्या दिवशी ज्या सुरक्षारक्षकांनी अनेक जीव वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांना आम्ही सलाम करतो. ते आमचे खरे नायक आहेत. दहशतवादाचा सामना करण्याचा आणि त्याला समूळ नष्ट करण्याचा आमच्या निर्धराचा पुनरुच्चार करण्याचा आजचा दिवस आहे.”
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close