26/11 च्या हल्ल्यात निकृष्ट दर्जाच्या शस्त्रास्त्रांमुळेच पोलिसांचा बळी : कोर्ट

November 26, 2014 1:09 PM0 commentsViews:

court_on_2611attack26 नोव्हेंबर : मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलंय. 26/11 च्या हल्ल्यात निकृष्ट दर्जाच्या शस्त्रास्त्रांमुळेच पोलीस अधिकार्‍यांचा बळी गेल्याचे ताशेरे कोर्टाने राज्य सरकारवर ओढले आहेत. सरकारने शस्त्रास्त्रांच्या धोरणाचा फेरआढावा घेण्यासाठी ताबडतोब एक समिती नेमावी, असे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.

पुण्याच्या अश्विनी राणे आणि वकील अनिल अंतुरकर यांच्या जनहित याचिकांवर कोर्टात सुनावणी झाली. या याचिकेवर कोर्टाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरलं. 26/11 सारखा दहशतवादी हल्ला झाल्यानंतरही 2010 सालापासून या धोरणांचा आढावाच न घेतला गेल्यानं हायकोर्टाने नाराजी व्यक्त केलीये. तसंच 16-16 तास अहोरात्र ड्युटी करणार्‍या पोलिसांना दर महिन्याला फक्त अडीचशे रुपयेच महागाई भत्ता मिळत असल्यानंही कोर्टाने खेद व्यक्त केलाय. दिवसांला फक्त 8 रुपये मिळत असतील तर पोलीस साधा वडापावसुद्धा विकत घेऊ शकत नाहीत, अशा शब्दांत कोर्टाने सरकारला खडेबोल सुनावले.

26/11 नंतर काय बदललं?
- स्पीडबोटी बंद पडल्यात
- सीसटीव्ही कॅमेरांचा प्रश्न अजूनही प्रलंबित
- सुरक्षा समन्वय समितीची बैठक वर्षभरात झाली नाही
- फोर्स वन साठी ट्रेनिंग सेंटरच्या जागेचा प्रश्न कायम
 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close