नंदुरबारमध्ये अशी आहे रुग्णांची व्यवस्था !

November 26, 2014 5:01 PM0 commentsViews:

निलेश पवार, नंदुरबार

26 नोव्हेंबर : राज्यात सर्वाधिक कुपोषण, बालमृत्यू आणि आरोग्याच्या समस्या भेडसावणारा जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख आहे. पण प्रशासन स्तरावर मात्र यासंदर्भात उदासिनता असल्याने आरोग्य व्यवस्थेकडे पूर्ण दुर्लक्ष होतंय. जिल्ह्यातल्या 12 पैकी 8 बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांची पदं रिक्त आहेत. जिल्ह्यातली संपूर्ण यंत्रणाच रामभरोसे काम करत असल्याचं दिसून येतं. यासंदर्भातला हा विशेष रिपोर्ट…

nanudarbar_pkgइथं ना फाईव्ह स्टार हॉस्पिटल्स, ना स्पेशलाईझ्ड डॉक्टर्स. काहीही झालं की, केवळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार असतो. पण आरोग्य यंत्रणेचा इथं पुरता बोजवारा उडालेला दिसतो. आरोग्य केंद्रात कोणत्याही सुविधा नसल्याने डॉक्टर आणि कर्मचारी आरोग्य केंद्रांमध्ये राहत नाहीत. त्यामुळे अनेक आरोग्य केंद्रांवर टाळं लागलेलं दिसतं. आरोग्य केंद्रांबाहेर रुग्ण तासन्‌तास डॉक्टरांची वाट बघत बसतात. वर्‍हांड्यामध्ये तात्पुरती सोय करून कोणीतरी उपचारसाठी यावं या प्रतिक्षेत नातेवाईक रुग्णांना घेऊन तिथंच ताटकळत बसतात.

जिल्ह्यात बाल विकास प्रकल्पाच्या 12 पैकी 8 अधिकार्‍यांची पदं रिक्त आहेत. तर 58 पैकी 41. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी केंद्रात मुक्कामाला नसतात. त्यामुळे रुग्णांना काही वेळा जीवही गमवावा लागतो. या संपूर्ण प्रकाराबद्दल आरोग्य अधिकारी मात्र कारवाई सुरू असल्याचं गुळमुळीत उत्तर देतात.

जिल्ह्यात ऍम्ब्युलन्ससारख्या सोयीही फारशा नाहीत. गावकरीच खांद्यावरच्या झोळीत रुग्णाला घालून मैलोन मैल प्रवास करतात. डोंगरातल्या पायवाटांमधून रस्ता शोधत रुग्णाला लवकर उपचार मिळावेत असा प्रयत्न करतात. एकीकडे शहरांमध्ये नवनवीन स्पेशलाइझ्ड हॉस्पिटल्स उभी राहत असताना दुसरीकडे आपल्याच राज्यातल्या जनतेला उपचारांअभावी जीव गमवावा लागतोय, हे दुदैर्वीच.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close