राज्य मंत्रिमंडळाचा 30 नोव्हेंबर किंवा 1 डिसेंबरला विस्तार ?

November 26, 2014 5:49 PM0 commentsViews:

fadanvis_mantralaya26 नोव्हेंबर : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. 30 नोव्हेंबर किंवा 1 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. आमदार आशिष शेलार, राज पुरोहित आणि संजय केळकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर 14 नावं राज्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. पण मित्रपक्षांबाबत काय निर्णय घ्यावा याबद्दल भाजप अजूनही संभ्रमात आहे.

राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन भाजपने सरकार स्थापन केलं. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात पहिले मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासह दहाजणांनी शपथ घेतली आणि काही दिवसांतच हे छोटेखानी मंत्रिमंडळ स्थापन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छोट्या मंत्रिमंडळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनीही तसेच पाऊल टाकले. पण आता फडणवीस यांची टीम जम्बो होण्याची शक्यता आहे. तीन मंत्री आणि 14 राज्यमंत्र्यांच्या समावेशासह 30 नोव्हेंबर किंवा 1 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मुंबईचे प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर माजी मुंबईचे अध्यक्ष आणि सलग तिसर्‍यांदा आमदार म्हणून निवडून आलेले राज पुरोहित यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. तर ठाण्यातून दमदार कामगिरी करणारे संजय केळकर यांचीही वर्णी लागणार आहे. पण पहिल्या मंत्रिमंडळात मित्रपक्षांना स्थान देण्यात आले नव्हते आणि आताही तसंच काही घडण्याची शक्यता आहे. महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे यांना कॅबिनेट मंत्रिपद हवंय. पण मंत्रिपदाबरोबरच त्यांना विधान परिषदही द्यावं लागणार आहे. या गोष्टीला भाजपमधल्या काही नेत्यांचा विरोध आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी सुरू आहे. एवढेच नाहीतर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर शिवसेना मंत्रिमंडळात सहभागी असेल असा दावा केला होता. पण अजूनही शिवसेनेला जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे या जम्बो मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार

- आशिष शेलार- मुंबई प्रदेश अध्यक्ष, अभ्यासू चेहरा, मुंबईत भाजपाचं विस्तार, विधानपरिषदेत चांगली कामगिरी
- राज पुरोहित- तिसर्‍यांदा आमदार, राज्यमंत्री नगरविकास, माजी मुंबई अध्यक्ष
- संजय केळकर- भाजपचा ठाण्यात शिरकाव, ठाण्यात संघनात्मक कार्य,
आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत

राज्यमंत्रिपद कोणाला मिळू शकतं?
गिरीश महाजन
देवयानी फरांदे
पांडुरंग फुंडकर
गिरीष बापट
गोवर्धन शर्मा
मदन येरावार
चंद्रशेखर बावनकुळे
राजकुमार बडोले
संभाजी पाटील-निलंगेकर
सुधाकर भालेराव
माधुरी मिसाळ
सुरेश खाडे
बाळा भेगडे
सुनील देशमुख
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close