नाशिकमध्ये ऊस, द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल

June 27, 2009 12:55 PM0 commentsViews: 20

27 जून, नाशिक दोन नक्षत्रं उलटून गेली तरी नाशिकमध्ये म्हणावा तसा पाऊस अजून सुरू झालाच नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. नाशिक जिल्ह्यात खरीपाच्या हंगामात उस, द्राक्ष आणि पोळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. पावसाने ताण दिल्याने हे सर्वच उत्पादक आता चिंतेत आहेत. नाशिक जिल्ह्यात पंधरा लाख एकर खरीपाचे लागवड क्षेत्र आहे. यंदाचा पावसाळा लांबल्याने,फक्त दीड टक्का लागवड पूर्ण झाली आहे. नाशिकमध्ये जवळपास तीन लाख एकरांत द्राक्ष आणि ऊस उत्पादन होतं. पण अजुन थेंबही न पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. भरपूर पाणी लागणारे द्राक्ष उत्पादक तर अडचणीत आहेत. तर पावसाच्या पाण्यावर शेती करणारे कांदा उत्पादक खूप अडचणीत आहे. त्यांनातर पोळ कांद्याचा सर्व हंगामच गमवण्याची भीती आहे. नाशिक जिल्हयात आठ लाख एकरांवर कांदा पिकतो. त्यामुळे कांदा लागवडीआधीच शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी आणतोय. खरीपाच्या हंगामात पंधरा लाख एकरांची काळी माती फुलवणारा नाशिकचा शेतकरी आता मोठ्या पावसाची वाट बघतोय.

close