इशारे देऊ नका, चौकशी करा, अजितदादांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

November 26, 2014 7:48 PM0 commentsViews:

ajit_pawar_vs_cmfadanvis26 नोव्हेंबर : चौकशीच्या भीतीने आम्ही पाठिंबा दिला नाही. जर चौकशी करायची असेल तर वेळेत पूर्ण करा, दोषी असेल तर शिक्षा होईलच पण दोषी नसेल तर क्लीन चीट द्या पण असे इशारे देऊ नका असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं. 26/11च्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते पोलीस जिमखान्यात आले होते. यावेळी त्यांनी आयबीएन लोकमतशी बातचीत केली.

भाजपने पाठिंबा न मागता राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केला आणि भाजपनेही राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केलं. पण सिंचन घोटाळा आणि इतर घोटाळ्याची चौकशी होऊ नये यासाठी राष्ट्रवादीने पाठिंबा दिला अशी चर्चा रंगलीये. त्यातच ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे त्या मंत्र्यांची चौकशी करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. पण अजित पवारांनी या सगळ्या आरोपांना फेटाळून लावत मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलंय. भाजपने आम्हाला पाठिंबा मागितला नाही. सरकार स्थिर राहावं यासाठी आम्ही त्यांना बाहेरून पाठिंबा दिला होता. हा पाठिंबा देत असताना कोणत्याही आमदार, मंत्र्यांची चौकशी करायची असेल तर सरकारने त्यांच्या परीने केली पाहिजे. परंतु हे सरकार आल्यापासून अशा पद्धतीने दाखवलं जातं की, चौकशी करू नये या भीतीने पाठिंबा दिलाय असं दाखवलं जातं आहे. पण हे धांदाट खोटं आहे. जर कुणी चुका केल्या असेल तर संबंधितांना मोजाव्या लागेल. जर कुणी चुकाच जर केल्या नसेल तर त्याला क्लीन चीट पण मिळाली पाहिजे अशी बाजूच अजित पवारांनी मांडली. विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडून असूनही उद्धव ठाकरे आमचं नाव का घेतात? आम्हांला आमची काम करू द्या? तुम्ही तुमची कामं करा ? असा टोलाही अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close