नागपुरात डम्पिंग ग्राऊंडमध्ये धुर’कल्लोळ’

November 26, 2014 7:03 PM0 commentsViews:

26 नोव्हेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातीलच भांडेवाडी डम्पिंग ग्राऊंडवरच्या कचर्‍याच्या आगीच्या धुरामुळे परिसरातल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय. गेल्या 6 महिन्यांपासून कचर्‍याच्या ढिगार्‍यांना सतत आग लागतेय, पण महानगरपालिका या आगीवर नियंत्रण मिळवू शकत नसल्यामुळे प्रशासनही हतबल आहे.

नागपूर शहरातल्या संपूर्ण कचरा हा भांडेवाडी डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो. आता हा भाग शहरात आल्यामुळे डम्पिंग ग्राऊंडच्या सभोवताल कॉलनीज झाल्या आहे. नागपूरच्या प्रसिद्ध शाळाही याच परिसरात आहेत. पण या कचर्‍यांच्या ढिगार्‍याच्या आगीमुळे या परिसरातल्या नागरिक विशेषत: लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक आजारी पडतायत. अनेकांना दम्याचा त्रास होतोय. गेल्या 6 महिन्यांपासून अशा आगींवर नियंत्रण मिळण्यात महापालिकेला अपयश आलंय.. जाणूनबुजुन हा कचरा पेटवला जात असल्याचाही आरोप परिसरातील लोकांनी केला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close