उडत्या कॅमेर्‍याची गोष्ट…!

November 26, 2014 9:27 PM0 commentsViews:

drone camera25 नोव्हेंबर : सध्या सर्वत्र चर्चा आहे ती उड्डाण करणार्‍या ड्रोन कॅमेर्‍याची. हा कॅमेरा केवळ शुटिंगच करत नाही तर हवेत उड्डाण करत शुटिंग करतो. त्यामुळे एरियल शुटिंगच्या तंत्रज्ञानाची ही थक्क करणारी झेप नक्कीच कौतुकास्पद आहे.

हा ड्रोन कॅमेरा म्हणजे नेमक काय तर हेलिकॉप्टर किंवा प्लेनला अटॅच असलेला कॅमेरा म्हणजे ड्रोन कॅमेरा. एखाद्या ठिकाणी आपल्याला जर प्रत्यक्ष जाता येत नसेल तर हा कॅमेरा आपल्याला पाठवता येतो. यापूर्वी एरियल फोटोग्राफी किंवा शुटिंग करणे डोकेदुखीचं काम होतं. आता मात्र या कॅमेरामुळे ते सोपं होताना दिसतंय. याआधी एखाद्या पुरग्रस्त भागाचं शूटिंग करायचं असेल तर विमानातून किंवा हेलिकॉप्टरमधून शुटिंग करावं लागायचं आणि त्यासाठी कॅमेरामनलाही बरीच कसरत करावी लागायची. पण आता हा कॅमेरा मानवनिर्मित विमानावर स्वार होऊन एखाद्या ठिकाणी जाऊन तिथलं शुटिंग करू शकतं. आणि हे सारं शक्य आहे ते त्यात कॅमेर्‍याला लावलेल्या सेंन्सॉरमुळे. हा कॅमेरा असेल तिथून तो सिग्नल देतो आणि रिमोट कंट्रोलच्या मदतीने ऑपरेट होऊ शकतो. डॉक्युमेंटरी मेकर्स, पत्रकार यांच्यासाठी हे तंत्रज्ञान खूपच उपयोगी आहे. अमेरिकेने इराकवर जे हवाई हल्ले केले त्यामध्ये हेच तंत्रज्ञान वापरलं गेलं. हा ड्रोन कॅमेरा आधी दहशतवाद्यांच्या तळाचं सर्वेक्षण करतो आणि नंतर अमेरिकेची क्षेपणास्त्र त्या ठिकाणचा अचूक वेध घेतात.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close