काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून राज्यसभेत हंगामा

November 26, 2014 10:00 PM0 commentsViews:

rajsabha3422232326 नोव्हेंबर : काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून आज (बुधवारी) राज्यसभेत मोठा हंगामा झाला. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसने गदारोळ घातला. काळा पैसा असलेल्यांवर खटला चालत नाही तोपर्यंत त्यांची नावं जाहीर करणार नाही अशी स्पष्ट भूमिका जेटलींनी मांडली तसंच एनडीए सरकारने नावांची यादी एसआयटीला दिली आहे असं आश्वासन जेटलींनी दिलं.

100 दिवसांत काळे पैसे भारतात आणणार असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलं होतं. याच मुद्यावरुन काँग्रेसने दोन दिवसांपासून सरकारला धारेवर धरलंय. मात्र काळ्या पैशावर सरकार धीम्या गतीने कारवाई करतंय, अशी टीका काँग्रेसनं केली. काळा पैसा असलेल्यांची नावं जाहीर केली तर त्याचा फायदा अशा खातेधारकांनाच होईल, असं जेटलींचं म्हणणं होतं. पण काँग्रेसने सरकार अपयशी ठरल्याचा मुद्दा लावून धरला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 100 दिवसांत काळा पैसा भारतात आणण्याचं आश्‍वासन दिलं. पण सहा महिन्यांत सरकार काळा पैसा आणू शकलं नाही, अशी टीका काँग्रेसनं केली. या मुद्द्यावरून काँग्रेसनं राज्यसभेतून सभात्याग केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close