फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो खेळणार रिअल माद्रीद टीमकडून

June 27, 2009 1:15 PM0 commentsViews: 20

27 जूनअव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो येत्या एक जुलैपासून रिअल माद्रीद टीमकडून खेळणार आहे. फुटबॉलमधल्या आतापर्यंतच्या सगळ्यात महागड्या सौद्यावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. रोनाल्डोने स्वत:च्या अटींवर माद्रीद टीमकडून खेळायला मान्यता दिली आहे. रोनाल्डो सध्या मँचेस्टर युनायटेड टीमशी करारबद्ध आहे. पण रिअल मादि्रद टीमने त्याला विकत घेण्यासाठी ऐंशी दशलक्ष पाऊंड एवढी रक्कम मँचेस्टर युनायटेडला देऊ केली होती. आणि आता रोनाल्डोनेही या कराराला मान्यता दिल्यामुळे पुढच्या हंगामात तो रिअल मादि्रद कडून खेळणार आहे. रिअल मादि्रद टीमच्या अधिकृत वेबसाईटवर या कराराचे सगळे तपशील देण्यात आले आहेत. हा करार सहा वर्षांसाठी आहे. आणि रोनाल्डोला दरवर्षी अकरा दशलक्ष पाऊंड यातून मिळतील. फूटबॉल जगतातला आतापर्यंतचा हा सर्वाधिक रकमेचा करार आहे. त्यामुळे रोनाल्डो सगळ्यात महागडा फूटबॉलपटू ठरला आहे.

close