ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन फिलिप ह्युजेसचं निधन

November 27, 2014 1:08 PM0 commentsViews:

feel27 नोव्हेंबर : उसळता बाऊंसर डोक्याला लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन फिल ह्युजेसचं निधन झालं. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी त्याचा मृत्यू झालाय. गेल्या तीन दिवसांपासून त्याच्यावर आयसीयूत उपचार सुरू होते मात्र अखेर आज त्याने अखेरचा श्वास घेतला.

25 नोव्हेंबरला सिडनीत सुरू असलेल्या साऊथ ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यू साऊथ वेल्स सामन्यात फिल 63 वर बॅटिंग करत होता. सीन ऍबोटनं त्याला बाऊंसर टाकत आऊट केलं. पण हा बॉल सरळ त्याच्या डोक्यात लागला आणि तो खाली कोसळला. त्याची प्रकृती गंभीर असल्यानं लगेच हेलिकॉप्टर बोलवून त्याला मैदानातूनच थेट हॉस्पिटलला नेण्यात आलं. उपचार सुरू असतानाच त्याचा दुदैर्वी मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण क्रिकेट जगतात शोककळा पसरलीय. क्रिकेट विश्वासाठी ही दुःखद घटना आहे. RIP फिल ह्युजेस. आम्ही मुंबई इंडियन्ससाठी ते भारतात आले होते, तेव्हापासून त्यांना ओळखतो. कायम आठवणीत राहतील अशी भावना माजी क्रिकेट अनिल कुंबळे यांनी व्यक्त केली.

कोण आहे फिलिप जोएल ह्युजेस ?
– वय 25
– ओपनिंग बॅट्समन
– 26 आंतरराष्ट्रीय टेस्ट मॅचेस
– 25 आंतरराष्ट्रीय वन डे मॅचेस
– श्रीलंकेविरुद्ध 2013मध्ये वन-डे पदार्पण
– ऑक्टोबर 2014मध्ये पाकिस्तान विरुद्ध शेवटची वनडे
– 2009मध्ये साऊथ आफिक्रेविरुद्ध टेस्ट पदार्पण
– ऑक्टोबर 2014 ला इंग्लंड विरुद्ध शेवटची टेस्ट मॅच
– पाकिस्तान विरुद्ध दुबईमध्ये ऑक्टोबर महिन्यात एकमेव T20
– 26 टेस्टमध्ये 1535 रन्स केले आहेत
– 25 वनडेमॅचमध्ये 826 रन्स केले आहेत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close