लोकल स्टेशनच्या परिसरात हेलिपॅड उभारण्यास सरकारचा होकार

November 27, 2014 1:24 PM0 commentsViews:

helipad342327 नोव्हेंबर : मुंबईतील लोकल रेल्वेचे नियमित अपघात होत असतात. या अपघातात लोकं मोठ्या प्रमाणात मृत्यू पावत असतात, जखमी होत असतात. जखमींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करता यावे यासाठी लोकल रेल्वे स्टेशन परिसरात हेलिपॅड उभारणीसाठी राज्य सरकारने तयारी दाखवली आहे.

रेल्वेचा अपघात झाल्यास जखमी व्यक्तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मुंबईतल्या लोकल रेल्वे स्टेशनच्या परिसरात हेलिपॅड उभारण्यात यावेत असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते. त्यानुसार आता लोकल रेल्वे स्टेशन परिसरात हेलिपॅडची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत बदल करावं लागणार आहेत. ती तयारी देखील राज्य सरकारने दाखवली आहे. सरकारने आता हेलिपॅडसाठी 14 जागा उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव तयार असल्याचं हायकोर्टाला सांगण्यात आलं. मात्र, ज्या जागा उपलब्ध करायच्या आहेत त्या राखीव आहेत.त्यांच्यावर वेगवेगळी आरक्षणं आहेत. आरक्षण असलेल्या जांगावर हेलिपॅडसाठी परवानगी द्यायची झाल्यास विकास नियंत्रण नियमावलीत बदल करावा लागणार आहे. त्यासाठी हेलिपॅडचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवला जाणार असल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close