फडणवीस सरकारची साफसफाई, सिडकोचं संचालक मंडळ बरखास्त

November 27, 2014 2:10 PM0 commentsViews:

cidco27 नोव्हेंबर : भाजप सरकार सत्तेवर विराजमान झाल्यानंतर कामाला लागलंय. नव्या सरकारनं आता महामंडळांच्या साफसफाईची मोहीम हाती घेतलीय. सरकारनं सिडकोचं संचालक मंडळ बरखास्त केलंय. सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्यासह सर्व सचालकांना पदावरून दूर केलं आहे.

सिडकोप्रमाणेच गेल्या आघाडी सरकारने केलेल्या महामंडळांवरच्या सर्वच नियुक्त्या रद्द केल्या जाणार आहेत. त्या ठिकाणी भाजप सरकारकडून नव्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत.

प्रत्येक नवं सरकार सत्तेवर विराजमान झाल्यानंतर निमशासकीय आणि शासकीय असलेल्या संचालक मंडळात फेरबदल करत असते. केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर मोदी सरकारने सर्व सचिवांनी बदली केली आणि राज्यपालांची बदलीही केली होती. तसंच यूपीए सरकारने घेतलेले निर्णय राखून ठेवण्यात आले आहे. राज्यात फडणवीस सरकारनेही आघाडी सरकारने घेतलेले निर्णय आता रद्द केले आहे. याचा पहिला फटका हा सिडकोला बसलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close