उद्धव ठाकरेंचा मनसेशी युती करण्यास नकार

June 27, 2009 1:24 PM0 commentsViews: 1

27 जून शिवसेना-भाजप युतीमध्ये मनसेला सामील करून घ्यायाला उध्दव ठाकरे यांनी नकार दिला आहे. मातोश्रीवर पत्रकारांशी बोलताना उध्दव ठाकरे यांनी मनसेविषयी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीत आलेलं अपयश धुऊन काढण्यासाठी सेना-भाजप युती तिस-या भागीदाराच्या शोधात आहे असं वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी नव्या पार्टनर बाबतची गुप्तता राखली. त्यावेळी उपस्थितांनी तिसरा भिडू हा मनसे असेल अशी वर्तवलेली शक्यता फेटाळून लावली. लोकसभा निवडणुकीत मनसेमुळे शिवसेना भाजप युतीला मुंबईत जागा गमवाव्या लागल्या होत्या. त्यामुळे भाजप नेत्यांनी मनसेला युतीत घेण्याचा आग्रह शिवसेनेकडे धरला होता.

close