मायकलचा मृत्यू औषधाच्या ओव्हरडोसने : जॅक्सनच्या वकिलांचा दावा

June 27, 2009 3:33 PM0 commentsViews: 42

27 जूनमायकल जॅकसनचा मृत्यू औषधाच्या ओव्हरडोसने झाल्याचं त्याच्या माजी वकिलांचं म्हणणं आहे. शुक्रवारी लॉस एजिंलिसमध्ये त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मायकल जॅक्सनच्या अचानक जाण्याने त्याच्या मृत्यूचं गूढ वाढतच चाललं आहे. मायकल त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचारांसाठी जात होता, अशी माहिती सन न्यूजपेपरने दिली आहे. कोट्यवधींचा धनी असणारा मायकल शेवटच्या काही दिवसांमध्ये कर्जबाजारी झाला होता, त्यापायी त्याचं मानसिक संतुलनही ढासळल्याची माहिती सन न्यूजपेपरने दिली आहे. दरम्यान, ड्रग्जच्या अति-आहारी गेल्यामुळे त्याला अनेक व्याधी जडल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. त्यामुळे मायकलचा मृत्यू नक्की कशामुळे झाला, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मायकलच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्याच्यावर उपचार करणारे डॉ. कॉनराड मुरे यांचा शोध लागला. मायकलच्या मृत्यूनंतर ते फरार झाले होते, त्यामुळे त्याच्या ट्रीटमेंटविषयी अनेक शंका निर्माण झाल्या होत्या. आता डॉ. मुरेंचा शोध लागल्यानंतर, त्याच्या ट्रीटमेंटविषयी, औषधांविषयी अधिक खुलासा होण्याची शक्यता निर्माण आहे. 'किंग ऑफ पॉप' अर्थात मायकलचा मृतदेह त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आलाय. मात्र, त्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला, याचा शोध सुरू आहे, अशी माहिती लॉस एन्जिलिसच्या पोलिसांनी दिली आहे. लॉस एन्जिलिस पोलीस खात्याचे प्रवक्ते क्रेग हार्वे यांच्या म्हणण्यानुसार मायकलचा मृत्यू अति-ताणामुळे झालेला नाही. तर तो नैसर्गिक मृत्यूच आहे. टॉक्सिकोलॉजीचे रिपोर्ट 4-6 दिवसांत येण्याची शक्यता आहे. मृत्यूपूर्वी डॉक्टरांनी सांगितलेली औषधं तो घेत होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूविषयी आताच काही सांगता येणं कठीण आहे, असंही क्रेग हार्वे म्हणाले आहेत. मृत्यूपूर्वी मायकल मोठ्या प्रमाणावर पेनकिलर घेत होता. एका अपघातात भाजल्यामुळे त्याला काही गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यानंतरच त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पेनकिलर देण्यात येत होत्या. हीच गोष्ट त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा दावा केला जात आहे. तसंच, त्याच्या जवळच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मायकल तीन पॉवरफुल नार्कोटिक वेदनाशामक औषधंही घेत होता. मायकल डेमेरोलचे इंजेक्शन्स रोज घेत होता. शुक्रवारी मायकलचा मृत्यू हा डेमेरोल या इंजेक्शनच्या ओव्हरडोसमुळे झाल्याचं सांगण्यात येत आहे. तो दिवसांतून तीनदा 'डेमरोल' या शक्तीशाली पेनकिलरचा डोस घेत होता. डेमरोल'चा त्याचा दरदिवशीचा डोसही खूप स्ट्राँग होता. याच औषधाच्या ओव्हरडोसमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी टीएमझेड या वेबसाईटवर केला आहे. याआधी हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतरही, 'डिलौडिड' हे पेनकिलर घेत होता. नुकतंच, त्याला 'विकोडिन' हे नार्कोटिक पेनकिलरही सुरू करण्यात आलं होतं. स्नायूंना आराम देणारं 'सोमा', 'सिडेटीव्ह' आणि 'क्झनॅक' तर नैराश्यावर मात करण्यासाठी 'झोलॉफ्ट' ही औषधं मायकल रोज घेत होता. त्याशिवाय, अस्वस्थता वाटल्यास 'पाक्झिल' चाही डोस घेत होता.

close