बेळगावी फलक लावा अन्यथा कारवाई, कर्नाटक सरकारचा हुकूम

November 27, 2014 7:47 PM0 commentsViews:

belgam27 नोव्हेंबर : कर्नाटक विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 9 डिसेंबरपासून बेळगावात सुरू होतंय. या पार्श्वभूमीवर दुकानदार आणि हॉटेलचालकांना फलकावर 1 डिसेंबरपासून बेळगावऐवजी बेळगावी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे नाव बदललं नाही तर कडक कारवाई केली जाईल असा इशारा कर्नाटक सरकारनं दिला आहे.

केंद्र सरकारच्या आदेशानंतर बेळगावचं नामांतर बेळगावी झालं. याची अंमलबाजवणी कर्नाटक सरकारने काही दिवसांत केली. पण 9 डिसेंबरला कर्नाटक सरकारच हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने शहरातील सर्व फलक बेळगावी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे सीमा भागातल्या मराठी भाषक व्यापार्‍यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. बेळगाव सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टात सुनावणी जवळ येतेय तसं कर्नाटक सरकारनं बेळगाव शहरावर अधिक आक्रमकपणे आपला अधिकार सांगायला सुरुवात केलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close