शिवसेनेचीही मोर्चेबांधणी, संभाव्य मंत्र्यांची यादी तयार ?

November 27, 2014 8:37 PM0 commentsViews:

sena_new_list327 नोव्हेंबर : भाजपने चर्चा करण्यासाठी तयारी सुरू केली असताना आता शिवसेनेनंही आपल्या मंत्र्यांची यादी तयार केलीये. शिवसेना नेतृत्वानं संभाव्य मंत्र्यांची यादी तयार केली, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. यात 5 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्र्याची नावं निश्चित करण्यात आली आहे. आयबीएन लोकमतच्या हाती शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावांची यादी लागली आहे. जर शिवसेना सत्तेत सहभागी झाली तर एकनाथ शिंदे, विजय शिवतारे, दिवाकर रावते आणि नीलम गोर्‍हे यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर राज्यमंत्रिपदाची माळ संजय राठोड आणि गुलाबराव पाटील यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.

शिवसेनेची यादी?

संभाव्य मंत्री
- एकनाथ शिंदे ( PWD किंवा MSRDC)
- विजय शिवतारे (कृषी मंत्री?)
- दिवाकर रावते (कॅबिनेट मंत्री?)
- नीलम गोर्‍हे (कॅबिनेट मंत्री?)

राज्यमंत्री
- संजय राठोड, दिग्रस, यवतमाळ
- गुलाबराव पाटील, जळगाव ग्रामीण
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close