दुधाची नव्हे दारूची गाडी !

November 27, 2014 8:58 PM0 commentsViews:

 gokul_milk_truk27 नोव्हेंबर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ संघाच्या वाहनातून गोव्यातली दारू शहरात आणली जात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आलीये. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून तब्बल 3 लाखांच्या दारुसह 9 लाखांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलाय.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांमध्ये अनेक ठिकाणी बनावट दारू जप्त करण्यात आलीये. गोकुळ दूध संघाची एक गाडी रोज गोव्याला दूध घेऊन जाते ही गाडी येताना रिकामी येते. पण आज उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला याची माहिती मिळाल्यावर कोल्हापूर जवळच्या कणेरी मठाजवळ या गाडीची अचानक तपासणी करण्यात आल्यावर हा प्रकार उघड झालाय. आजच्या कारवाईत 3 लाखांच्या दारुसह 9 लाखांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलाय. दरम्यान, ही वाहतूक चालक आणि क्लिनर परस्पर करतात की, त्यांना आणखी कुणाची साथ आहे. याबाबत आता उत्पादन शुल्क विभागाने तपास सुरू केलाय. दरम्यान, या गाड्या ठेकेदारामार्फत भाडेतत्वावर घेतल्या जातात त्यामुळे गोकुळ दूध संघाचा घटनेशी काहीही संबंध नाही असं गोकुळच्या वतीनं सांगण्यात आलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close