सरबजीतची फाशी रद्द करण्यासाठी ऍड. हमीद विशेष प्रयत्नशील

June 27, 2009 3:41 PM0 commentsViews: 4

27 जूनपाकिस्तान न्यायव्यवस्थेने सरबजीतला सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी वकील ऍड. राणा अब्दुल हमीद विशेष प्रयत्न करत आहेत. ऍड. राणा अब्दुल हमीद यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष आसीफ अली झरदारी यांच्याकडे सरबजीतची फाशीची सजा रद्द करून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची मागणी केली आहे. सरबजीतने आणि त्याच्या कुटुंबीयांनी अध्यक्ष झरदारी यांच्याकडे फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी दयेची याचिका केली आहे. त्या याचिकेवर अध्यक्ष विचार करतील, अशी माहिती ऍड. अब्दुल हमीद यांनी दिली आहे. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशरफ यांनी सरबजीची दयेची याचिका फेटाळून लावली होती. पण झरादारींनी दयेच्या याचिकेवर काही निर्णय न देण्यामागचं कारण कळत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. लाहोरमध्ये 1990 साली झालेल्या बॉम्बस्फोटांचा आरोप सरबजीतवर पाकिस्तान सरकारने केला होता. गेली 18 वर्षं तो पाकिस्तानमधल्या लखपत तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याला शिक्षा होऊ नये यासाठी भारतसरकार विशेष प्रयत्नशील आहे.

close