मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात पत्रकं भिरकावली

November 27, 2014 10:46 PM0 commentsViews:

abad_cm_patrak27 नोव्हेंबर :औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात गोंधळ उडाला. जवखेड तिहेरी दलित हत्याकांड प्रकरणातील आरोपी न सापडल्याचा निषेध करत संविधान बचाव संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांवरच पत्रकं भिरकावली.

औरंगाबादेत भाजपच्या सदस्यता नोंदणीचा कार्यक्रमात मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना अचानक 10 ते 12 कार्यकर्त्यांनी येऊन कार्यक्रमात जोरदार घोषणाबाजी केली. व्यासपीठाकडे धाव घेत मुख्यमंत्र्यांवरच पत्रकं भिरकावली. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close