जम्मूमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान

November 27, 2014 10:55 PM0 commentsViews:

jammu27 नोव्हेंबर : जम्मू-काश्मीरच्या आर्निया सेक्टरमधल्या कथार गावात लष्कराची दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. लष्कराच्या जवानांनी 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. या चकमकीत आतापर्यंत 3 जवान शहीद झालेत तर 3 स्थानिकांचा मृत्यू झालाय.

बंकर्समध्ये दहशतावदी लपून बसले असतील या शक्यतेनं लष्करानं परिसर पिंजून काढण्यासाठी आता रणगाड्यांची मदत घेतली आहे.

तसंच संवेदनशील भागामध्ये हाय अलर्ट जारी केल्याचं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितलंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close