राज्यात स्वतंत्र निवडणुका लढण्यासाठी काँग्रेसचा राहुल गांधींवर वाढता दबाव

June 27, 2009 3:45 PM0 commentsViews: 2

27 जूनमहाराष्ट्रात स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर दबाव आणत असल्याचं अनिल शास्त्री यांच्या लेखातून स्पष्ट झालं आहे. अनिल शास्त्री काँग्रेसचं मुखपत्र ' काँग्रेस संदेश 'चे संपादक असून ते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आहेत. काँग्रेस वर्किंग कमिटी ही काँग्रेस पक्षाची सर्वोच्च समिती आहे. या समितीतून काँग्रेस पक्षाचे धोरणात्मक निर्णय घेतले जातात. पक्षात भावना आहे की, काँग्रेसने महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी पक्षाची सध्याची भावना आहे. राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेश, बिहारमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय यशस्वी झाला होता. तसाच प्रकार महाराष्ट्रातही व्हावा अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका आहे, असं ' काँग्रेस संदेश ' या लेखातून अनिल शास्त्री यांनी म्हटलं आहे. अनिल शास्त्री यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या सांगण्यानुसारच हा लेख लिहिला असावा असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

close