अकरावीचे प्रवेश हे ऑनलाईनच होणार : शिक्षणमंत्री

June 27, 2009 3:50 PM0 commentsViews: 5

27 जून11 वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार, अशी माहिती शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी आयबीएन-लोकमतशी बोलताना दिली. ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थी किंवा पालकांना इंटरनेटवर कनेक्टीव्हिटीचा काही प्रॉब्लेम येत असल्यास त्यांनी एमकेसीएलच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. ऑनलाईन प्रवेशाबद्दलच्या माहितीपुस्तिकेमध्ये दिलेला फॉर्म विद्यार्थ्यांनी जर ऑफलाईन भरला आणि ऑनलाईन सेंटरवर दिला तर तो अपलोड केला जाईल, अशी ग्वाही शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. 4 जुलैपर्यंत ऍडमिशन अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकाचा अर्ज स्वीकारला जाईल, कुणीही चिथावण्यांना बळी पडू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. ऑनलाईन प्रवेशासाठी आतापर्यंत 2 लाख 2 हजार 886 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तर 60हजार 999 विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे भरल्याची माहिती एमकेसीएलने शनिवारी संध्याकाळी 5 वाजता दिली. दरम्यान मुंबईत उपनगरातल्या वसई, नालासोपारा, कांदिवली, ठाणे, अंबरनाथच्या काही केंद्रांवर शनिवारी सकाळपासून ऑनलाईन ऍडमिशनची वेबसाईट खूप हळू चालत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. पण, त्याची दखल शिक्षण विभागाने घेतली असून एकेक सीलकडून त्या तक्रारी दूर केल्या जातील, असंही शिक्षण व्यवस्थापन तज्ज्ञ सुधीर चितळे यांनी सांगितलं आहे.

close