अल्पवयीन मुलीवर बाप-बेट्याकडून बलात्कार

November 28, 2014 5:49 PM0 commentsViews:

rape_63456528 नोव्हेंबर : एका 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारील राहणार्‍या मुलाने आणि त्याच्या वडिलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडलीये. गेली वर्षभर ही नराधम बाप-बेट्याची जोडी पीडितेवर अत्याचार करत होते. अखेर त्यांच्या काळ्याकृत्याचा भांडा फूटला. भांडूप पोलिसांनी या दोन्ही नराधमांना अटक केली आहे.

पीडित मुलगी ही आपल्या आईसोबत भांडूपमध्ये राहते. तीची आई दिवसभर कामाला जात होती. यावेळी 60 वर्षीय आरोपी या मुलीला आपल्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार करत होता. हा नराधम बाप एवढ्यावरच थांबला नाही तर आपल्या 25 वर्षाच्या मुलाला सुद्धा या मुलीवर बलात्कार करावयास सांगत असे. आणि दोघांनी गेल्या एका वर्षांपासून हा प्रकार सुरू होता.गुरुवारी रात्री या मुलीला पोटात त्रास जाणवत असल्याने तिने आपल्या आईला सांगितले. यावर सगळा प्रकार समोर आला. तिच्या पालकांनी भांडूप पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही नराधमास अटक केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close