‘झालं गेलं विसरा नव्याने कामाला लागा’

November 28, 2014 7:18 PM0 commentsViews:

raj_nashik43528 नोव्हेंबर : ‘मागचं सगळं विसरुन जा आणि नव्या जोमानं कामाला लागा’ असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या कार्यकर्त्यांना दिलाय. तसंच दोन आठवड्यांपूर्वी वसंत गीते आणि इतर पदाधिकार्‍यांच्या राजीनामानाट्यावर भाष्य न करता राज यांनी खांदेपालट करण्याचे संकेत दिले आहे.

विधानसभा निवडणुकीतील मनसेच्या दारुण पराभवानंतर राज ठाकरे प्रथमच नाशिक दौर्‍यावर आले आहेत. विशेष म्हणजे अलीकडेच प्रदेश सरचिटणीस वसंत गीते, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे या पदाधिकार्‍यांच्या राजीनामानाट्य घडवलं होतं. पण राज यांची कन्या उर्वशीच्या अपघातामुळे राज यांनी दौरा रद्द केला होता. आज राज ठाकरे मराठवाड्याचा दौरा आटोपून नाशकात दाखल झाले. पण यावेळी वसंत गीते या दौर्‍यात कुठेच नव्हते. नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर राज यांनी सकाळी मनसेच्या नगरसेविका अर्चना जाधव यांची सांत्वनपर भेट घेतली. त्यांचे पती संजय जाधव यांचा गेल्याच आठवड्यात डेंग्यूनं मृत्यू झालाय. त्यानंतर नाशिक महापालिकेचे नवीन आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याशी त्यांनी चर्चा केली. तसंच दिवसभरात सिडको आणि सातपूर परिसरातील मनसे पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. रविवारपर्यंत राज ठाकरे नाशिकमध्ये आहेत. त्यामुळे गीते आणि पदाधिकार्‍यांच्या राजीनामानाट्यावर राज काय कारवाई करणार हे पाहण्याचं ठरणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close