उल्हासनगरमध्ये100 जणांना विषारी वायूची बाधा, 10 जण ICUमध्ये

November 29, 2014 1:30 PM0 commentsViews:

ullhasnagar29 नोव्हेंबर : मुंबई जवळील उल्हासनगरमध्ये नाल्यात सोडलेल्या विषारी रसायनामुळे 100 जणांना विषारी वायुची बाधा झाली आहे. सर्व बाधीत व्यक्तींवर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यापैकी 10 जण अतिदक्षता विभाग (ICU) मध्ये आहेत. तर इतर 90 जणांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलंय.

विषारी रसायनाने भरलेला टँकर कोणीतरी वालधुनी नाल्यात रिकामा केल्याने या सगळ्यांना विषारी वायुची बाधा झालीय. रासायनिक कंपन्यांमध्ये निर्माण होणारं धोकादायक, विषारी सांडपाणी वस्तीपासून दूर सोडण्यासाठी टँकर मालकांना लाखो रुपयांचं कंत्राट दिलं जातं. 100 ते 150 किलोमीटर दूर न जाता. डिझेल वाचवण्याच्या लोभानं हे टँकर जवळच्याच नाल्यात रिकामे करण्यात येतात. उल्हासनगरमधला प्रकराही त्यातूनच घडलेला आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात येथील सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. तर खासदार श्राीकांत शिंदे, आमदार ज्योती कलानी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी सेंट्रल हॉस्पिटलला भेट देऊन रूग्णांची केली विचारपूस केलीय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close