आरिफला 8 डिसेंबरपर्यंत एनआयए कोठडी

November 29, 2014 2:30 PM0 commentsViews:

arif29 नोव्हेंबर : इराकमध्ये आयसीस या दहशतवादी संघटनेत सहभागी झालेल्या आरिफ माजिदला कोर्टाने 8 डिसेंबरपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. आज सकाळी एनआयएने चौकशीनंतर अटक केलीय. बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायदा आणि इंडियन पीनल कोडनुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आलीय. त्याला आज कोर्टात हजर करण्यात आलं. एनआयएच्या अधिकार्‍यांनी आरिफच्याअधिक चौकशीसाठी कोठडीची मागणी केली. कोर्टाने एनआयएची मागणी मंजूर करत 8 डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

मुंबईतील कल्याण इथला रहिवासी असलेला आरिफ माजिद मे महिन्यात इराकला पळून गेला होता. जिहादसाठी आपण आयसीस संघटनेत सहभागी झालो असल्याचं त्याने कबूल केलंय. 23 वर्षांचा आरिफ ठार झाल्याचं आधी समजलं होतं. पण नंतर त्याने तुर्कस्थानातून घरी फोन केला आणि परत येण्याची इच्छा व्यक्त केली. काल तो मुंबईत परतला. एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसने त्याची कसून चौकशी केली. मे महिन्यात कल्याणचे 4 तरूण बेपत्ता झाले होते. इंटरनेटवरच्या जिहादी साहित्याने आरिफ प्रभावित झाला होता. इतर तिघांसोबत तो बगदादला गेला. तिथे 15 दिवस धार्मिक प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला युद्धभूमीवर पाठवण्यात आलं. तो गोळीबारात जखमी झाला होता. शुक्रवारी एनआयएच्या टीमने त्याला भारतात आणला. आपण दहशतवादी संघटनेत सहभागी झालो याबद्दल पश्चात्ताप झाला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळे काल त्याला एनआयएनं अटक केली. आरिफ भारतातून इराकला कसा गेला हे मात्र त्याने अजून सांगितलं नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close