फिल ह्युजेसच्या मृत्युमुळे भारत-ऑस्ट्रेलिया पहिली टेस्ट पुढे ढकलली

November 29, 2014 4:20 PM0 commentsViews:

ind_vs_aus3429 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलीप ह्युजेसच्या अचानक मृत्युमुळे भारतासोबतची पहिली टेस्ट मॅच आता पुढे ढकलण्यात आलीये. येत्या गुरूवारी 4 डिसेंबरला खेळवण्यात येणारी ही मॅच आता नंतर होणार आहे, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पत्रक प्रसिद्ध करून स्पष्ट केलंय. मॅचची तारीख नंतर ठरवण्यात येणार आहे.

फिल ह्युजेसवर पुढील आठवड्यात बुधवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. आपल्या जवळच्या मित्राला अशाप्रकारे गमावल्यामुळे अनेक खेळाडूृ खेळण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे ही मॅच आता पुढे ढकलण्यात आलीये. तिन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या एका सामन्यात फिलच्या डोक्याला बॉल लागल्यामुळे गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे तो मैदानातच कोसळला होता. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र दोन दिवस मृत्यूशी त्यांची झुंज अपयशी ठरली. उपचार सुरू असतांना फिलने अखेरचा श्वास घेतला. अवघ्या 25 वर्षाच्या फिलच्या अकाली निधनामुळे क्रिकेट जगतावर शोककळा पसरलीये. त्यामुळेच भारत आणि ऑस्ट्रेलियाची पहिले टेस्ट पुढे ढकलण्यात आलीये.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close