90:10 कोटा फॉर्म्युलाची सुनावणी बुधवारी

June 30, 2009 7:41 AM0 commentsViews: 5

30 जून अकरावी प्रवेशाच्या 90:10 कोटा फॉर्म्युलाची सुनावणी अखेर बुधवारी होण्याची शक्यता आहे.मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार आणि न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या खंडपीठापुढे सोमवारी सुनावणी होणार होती. पण कोट्याच्या बाजूने आणि विरोधात अशा दोन्ही बाजूंनी याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर एकत्रितच सुनावणी द्यायची असल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. परिणामी 90 :10 कोटा फॉर्म्युलाचा निर्णय नक्की काय लागतोय , याबाबत विद्यार्थी आणि पालकांबरोबरच सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

close