दिल्लीत धूम स्टाईल चोरी, 1.5 कोटींची रोकड लुटली

November 29, 2014 8:49 PM0 commentsViews:

delhi_dhom_thif28 नोव्हेंबर : राजधानी दिल्लीत भर दुपारी बाईकवरुन आलेल्या दोन चोरांनी तब्बल दीड कोटींची रोकड लंपास केल्याची घटना घडलीये.चोरांनी सुरक्षारक्षकावर गोळीबार केला यात त्याचा मृत्यू झाला. दिल्लीमधील कमला नगर इथंही घटना घडली. हा सगळा थरारक प्रकार मोबाईल कॅमेर्‍यात कैद झाला.

दिल्लीत कमला नगर इथं सकाळी 11 वाजेच्या सुमारास सिटी बँकेच्या एटीएममध्ये रक्कम भरण्यासाठी 1.5 कोटींची रोकड घेऊन एक व्हॅन पोहचली होती. त्याचवेळी या व्हॅनवर पाळत ठेवून असलेल्या दोन चोर बाईकवरून आले आणि सुरक्षारक्षकावर गोळीबार केला. 1.5 कोटी रुपयांनी भरलेली बॅग चोरांनी लंपास केली. गोविंद असं या सुरक्षारक्षकांचं नाव होतं. या गोळीबारात सुरक्षारक्षकाच्या डोक्यावर आणि छातीवर गोळी लागली त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना जेव्हा घडली तेव्हा तिथे दोन सुरक्षारक्षक आणि दोन बँकेचे कर्मचारी होते. बाईकवरून आलेले चोर अगोदर एटीएम व्हॅनचा पाठलाग करत होते. ही बाब सुरक्षारक्षक गोविंद यांच्या लक्ष्यात आली. व्हॅन एटीएमजवळ पोहचली असता गोविंद खाली उतरत नाही तेच चोरांनी गोळीबार केला. आणि दुसर्‍या सुरक्षारक्षकाच्या हातात असलेली 1.5 कोटी रुपयांनी भरलेली बॅग बंदुकीचा धाक दाखवून लंपास केली अशी माहिती संयुक्त पोलीस आयुक्त संदीप गोयल यांनी दिली. हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेर्‍यात कैद झाला. या व्हिडिओच्या आधारे पोलीस चोरांचा शोध घेत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close