पुतळे उभारल्याप्रकरणी मायावतींना सुप्रिम कोर्टाची चपराक

June 29, 2009 2:17 PM0 commentsViews: 2

29 जून पुतळे उभारण्यासाठी जनतेचे कोट्यावधी रुपये खर्च केल्याप्रकरणी सुप्रिम कोर्टाने मायावतींना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. आपले राजकीय गुरू काशीराम आणि स्वतःच्या पुतळ्यासह मायावतींनी राज्यात गेल्या काही दिवसात अनेक पुतळे उभारले आहेत. तसंच यासंदर्भात कोर्टात जनहितयाचिका दाखल असतानाही मायावतींनी नुकतंच एका पुतळ्याचं अनावरण केलं होतं. पुतळ्यावरील खर्चाचं उत्तर त्यंाना चार आठवड्यात देण्याचे निर्देश सुप्रिम कोर्टाने मायावतींना दिले आहेत.

close