बेळगावात मराठी शेतकर्‍यांच्या जमिनी बळकावण्याचा कानडी मनसुबा

November 29, 2014 10:23 PM0 commentsViews:

karantak28 नोव्हेंबर : बेळगाव शहराच्या आजुबाजूला जे मराठी शेतकरी राहतात,त्यांची जमीन बळकवण्याचा कर्नाटक सरकारचा मनसुबा आहे. कर्नाटक सरकारने यासाठी एक मास्टर प्लॅनही काढलाय. यात 30 हजार एकरपेक्षा जास्त सुपीक जमीन विविध विकासकामांसाठी लाटण्याची तयारी केलीये.

कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये मराठीजणांवर कानडी वरवंटा भिरवण्याची एकही संधी आजपर्यंत सोडली नाही. आता तर मराठी जणांच्या बेळगाव शहराच्या लगत असलेल्या 25 खेड्यांमधील जमीन बळकावण्याचा डाव आखण्यात आलाय. हिवाळी अधिवेशनात अपक्ष आमदार पी. राजीव हा मुद्दा कर्नाटकच्या विधानसभेत मांडणार आहे. याचा विरोध करण्यासाठी तब्बल एक लाख शेतकरी विधानसभेवर मोर्चा काढणार आहेत. बेळगावच्या आसपासचा मराठी टक्का कमी करण्यासाठी हे सगळं केलं जातंय, असा शेतकर्‍यांचा आरोप आहे. आताच्या शेतजमिनीवर कारखाने, ट्रक टर्मिनल्स, गार्डन्स आदी बांधण्याचा कर्नाटक सरकारचा मानस आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close