पोलिसांची प्रतिमा चित्रपटांतून मलिन – मोदी

November 30, 2014 4:14 PM1 commentViews:

modi in amravati30 नोव्हेंबर : प्रत्येक पोलीस कर्मचारी हा आपल्या कामाबाबत कठोर असला पाहिजे,संवेदनशील आणि तितका सतर्कही असला पाहिजे. आज पोलिसांसमोर मोठी आव्हानं आहे पण तरीही पोलिसांनी स्मार्ट बनलं पाहिजे असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय. तसंच चित्रपटांतून पोलिसांची प्रतिमा मलिन दाखवली जात आहे असा खेदही त्यांनी व्यक्त केला. आज गुवाहाटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या परिषदेचं उद्घाटन झालं. यावेळी मोदींनी पोलिसांची जोरदार पाठराखण करत सुरक्षेवर भर दिला.

गुवाहाटीच्या परिषदेत मोदींनी पोलिसांना SMART होण्याचा मंत्र दिला. SMART चा अर्थ S म्हणजे स्ट्रिक्ट आणि सेंसिटिव्ह, M म्हणजे मोबाईल, A म्हणजे अलर्ट, R म्हणजे रिलायबल आणि T म्हणजे टेक सेव्ही असला पाहिजे. खरंतर पोलिसांचा आयुष्य तणावपूर्ण आहे. तरीही आपल्या जीवाची बाजी लावून पोलीस आपली ड्युटी चोखपणे बजावतो. भारताच्या स्वातंत्र्य काळानंतर आजपर्यंत 33 हजार पोलीस आपलं कर्तृत्व बजावताना शहिद झाले. त्यांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये. पोलिसांचं कौटुंबिक आयुष्य चांगले असले तर ते चांगलं काम करतील यासाठी पोलिसांच्या कुटुंबियांना विशेष प्राधान्य दिलं पाहिजे असं मत मोदींनी व्यक्त केलं.

एखादा पोलीस अधिकारी चुकीच्या कामात आढळला तर मीडियामध्ये ती ब्रेकिंग न्यूज बनते, पण दुसरीकडे पोलिसांना चांगले काम केले तर त्याची दखल घेतली जात नाही. पोलीस दलाने जी काही चांगली काम केली आहे ती जनतेपर्यंत पोहचणे गरजेच आहे. यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनने आपली वेबसाईट तयार करून जनतेपर्यंत चांगल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहचवावी. पोलिसांच्या शौर्याची गाथा पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरली पाहिजे अशी माहिती दिली पाहिजे असा सल्लाही मोदींनी दिला. तसंच आज चित्रपटांतून पोलिसांची प्रतिमा मलिन दाखवली जात आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. एक व्यक्ती जर चुकतं असले तर सगळ्यांना दोषी ठरवता येत नाही. चित्रपट इंडस्ट्रीने पोलिसांची प्रतिमा चांगली दाखवली पाहिजे अशी अपेक्षाही मोदींनी व्यक्त केली.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • amit

    मोदी साहेबांनी सिंघम , मर्दानी , wanted , दबंग ह्या मुव्ही पहिल्या नाहीत वाटत ..

close