आरिफची होणार नार्को टेस्ट

November 30, 2014 4:47 PM1 commentViews:

arif30 नोव्हेंबर : इराकमध्ये आयसीस दशहतवादी संघटनेत सहभागी झालेल्या आरिफ माजिदची कसून चौकशी सुरू आहे. लवकरच आरिफची नार्को टेस्ट आणि लाई डिटेक्टर टेस्ट होणार आहे. या टेस्टमधून आरिफकडून जास्तीत जास्त माहिती मिळेल असा विश्वास एनआयएने व्यक्त केला. याबाबत एनआयएने कोर्टाकडे परवानगी मागणार आहे.

कल्याणचा रहिवासी असलेला आरिफ माजिद मे महिन्यात जिहादसाठी आयसीस संघटनेत सहभागी होण्यासाठी आपल्या तीन मित्रांसह इराकलागेला होता. इराकमध्ये झालेल्या यादवीत आरिफला दोन गोळ्या लागल्या होत्या. त्यामुळे त्याला बाजूला करण्यात आले होतं. इराकमधून आरिफ तुर्कीला गेला आणि आता भारतात परतलाय. आरिफ इराकाच्या यादवीत वाचून आला खरा पण तो तोंड उघडण्यास तयार नाही. आपण केलेल्या कृत्यावर त्याला जराही पश्चाताप सुद्धा नाही. त्यामुळे एनआयएने चौकशीचा फास अधिक आवळला आहे. तीन दिवसांपूर्वी आरिफला भारतात आणण्यात आलंय. त्याला अटक करण्यात आली असून कोर्टाने 8 डिसेंबरपर्यंत एनआयए कोठडी दिली आहे. नेमका आरिफ इराकमध्ये कसा पोहचला, तो कुणाच्या संपर्कात होता याचा शोध एनआयए घेत आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • amit

    देश द्रोह केला म्हणून फाशी देऊन टाका ..परत कोणी असला उप्द्याव्प करणार नाही नाहीतर सांभाळावे लागेल आयुष्यभर

close