ईशान्य भारताच्या रेल्वे विकासासाठी 28 हजार कोटींची देणगी, पंतप्रधानांची घोषणा

December 1, 2014 12:08 PM0 commentsViews:

pm in nagalayand3401 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागालॅन्डच्या दौर्‍यावर आहेत. नागालँडच्या ‘हॉर्नबिल फेस्टिव्हल’मध्ये पंतप्रधान सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी ईशान्य भारताच्या रेल्वे विकासासाठी 28 हजार कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं जाहीर केलं. तसंच ईशान्या भारत हा भारताचा एनईझेड म्हणजेच ‘नॅचरल इकॉनॉमिक झोन’ आहे त्यामुळे याचा विकास करणार असं मोदींनी स्पष्ट केलं.

नागालँडची संस्कृती, धनेश पक्ष्याचं संवर्धन आणि संगोपन करण्यासाठी हा फेस्टिव्हल आयोजित केला जातो. आज या फेस्टिव्हलसाठी मोदींनी हजेरी लावली. ईशान्य भारताला निसर्गाची दैवी देणगी मिळाली असली तरी मात्र जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करायला हवं असं मोदी यावेळी म्हणाले. तसंच नागालँड आणि ईशान्य भारताला देशाशी जोडणार, आणि उत्तम रस्ते, रेल्वे आणि विमानसेवा सुरु करण्याला प्राधान्य देणार असल्याचं आश्वासन मोदींनी यावेळी दिलं. ईशान्य भारतातील लोकांना उत्तम इंग्लिश येतं तसंच धनुर्विद्या, बॉक्सिंगमध्ये ईशान्य भारताचे लोक तरबेज आहेत. ईशान्या भारत हा भारताचा एनईझेड म्हणजेच ‘नॅचरल इकॉनॉमिक झोन’चा विकास करणार असल्याचंही मोदी म्हणाले. ईशान्य भारताच्या विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती देणार असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close