अपघातवार, दोन वेगवेगळ्या अपघातांत 10 ठार

December 1, 2014 1:25 PM0 commentsViews:

akola_accident01 डिसेंबर : आज वर्षाच्या अखेरच्या महिन्याला सुरूवात झालीये. पण आजचा दिवस हा अपघातवार ठरलाय. राज्यात दोन ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात 10 लोकांचा मृत्यू झालाय. अकोल्यात मूर्तीजापूरजवळ कार आणि ट्रकच्या धडकेत 7 जण ठार झाले तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस हाय वेवर कारला झालेल्या अपघातात 3 जण ठार झालेत.

अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूरजवळच्या नवसाळा फाट्याजवळ ट्रक आणि ओम्नीची कारची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील सात जणांचा मृत्यू झाला. तर 5 जण जखमी आहेत. जखमींवर अकोल्यातल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  तर दुसरा भीषण अपघात घडला मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर. उर्से टोलनाक्याजवळ भरधाव वेगात असलेल्या महिंद्रा एक्सयूव्ही ही गाडीवरचा ताबा सुटल्यामुळे भीषण अपघात झाला. ड्रायव्हरचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने पलटी झाली. या अपघातात तीन जण ठार झालेत आणि दोन जण गंभीर जखमी झाले आहे. सर्व मृत आणि जखमी हे रायगड जिल्ह्यातले आहेत. या अपघातानंतर जखमींना तातडीने लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आलं आहे. तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close