‘ऊस जळून खाक’

December 1, 2014 3:23 PM0 commentsViews:

01 डिसेंबर :  अगोदरच दुष्काळामुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आलंय त्यात शासकीय अनास्था शेतकर्‍याला पूर्ण उद्‌ध्वस्त करतीये. रविवारी सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोटमध्ये महावितरण कंपनीची विजेची तार पडल्यानं चार एकर ऊस जळून खाक झालाय. हातातोंडाशी आलेला ऊस डोळ्यादेखत जळत असताना शेतकरी बसवराज सुतार काहीच करू शकत नव्हते. हुन्नुर परिसरात अनेक ठिकाणी विजेच्या तारा सैल झाल्या आहेत, अनेक ठिकाणी त्या लोंबकळतायेत, तरीही महावितरणचं मात्र दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close