‘त्या’ ‘मर्दानी’ लढल्या,पण कुणीच मदतीला धावलं नाही !

December 1, 2014 4:38 PM0 commentsViews:

hariyana232301 डिसेंबर : प्रवाशांनी भरलेली बस…तरुणाईचा उन्माद चढलेल्या तीन टारगट तरुण…आणि दोन बहिणी या गर्दीतून स्वत:ला सावरत प्रवास करत होत्या…पण त्या टारगट तरुणांनी दोघा बहिणींची छेड काढली…एकदा जाऊ द्या…दुसर्‍यांदा द्या जाऊ द्या पण तिसर्‍यांदा ही असंच घडल्यामुळे या बहिणींची चांगलीच ‘सटकली’…आणि या दोन ‘मर्दानी’ बहिणींनी धाडस करून भर बसमध्ये या तीन तरुणांना बेदम चोप दिला. पण याहून शर्मेची बाब म्हणजे या दोन तरुणी जीवाच्या आकांताने या तरुणाला चोप देत होत्या पण बसमधील प्रवासी नुसती बघ्याची भूमिका घेऊन मठ्ठपणे बसलेले होते. उलट या बहिणींनाच शांत बसण्याचा सल्ला देत होते असा खुलासा या दोन धाडसी बहिणींनी केला.

घडलेली हकिकत अशी की, रविवारी हरियाणातील रोहतकजवळ ही घटना घडली. पूजा आणि आरती या दोन बहिणी आपल्या घराकडे बसने प्रवास करत होत्या. पण रोहतक बस स्टँडपासून तीन तरूण भर बसमध्ये दोन बहिणींची छेड काढत होते. बसमधला हा प्रकार नेहमीचा असल्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण त्या तरुणांनी पुन्हा दोघींनी छेडलं आणि धमकी द्यायला लागले. दोघींवर शेरेबाजी करू लागले. पण हा प्रकार इथंच थांबला नाही त्या तरुणांनी दोघी बहिणींशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाहीतर या तरुणींनी आपल्या मोबाईल फोनवरून माहिती देण्याचा प्रयत्न केला तेव्हा या तरुणांनी फोनही हिसकावून घेतला. त्यामुळे संतापलेल्या या दोन्ही बहिणींनी या तरुणांवर एकच हल्लाबोल केला. कमरेचा पट्टा काढून या बहिणींनी तरुणांना चोप दिला. पण याहून शर्मेची बाब म्हणजे या तरुणी जेव्हा तरुणांना चोप देत होत्या तेव्हा बसमधील लोक शांत बसलेली होती. कुणीही या भांडणात पडायला तयार नव्हते. उलट या तरुणींनाच दोष ठरवून शांत बसण्याचा सल्ला देत होते असा खुलासा या दोन्ही बहिणींनी केला. तब्बल अर्धातास सुरू चाललेल्या गोंधळात कुणीच पडायला तयार नव्हते. अखेरीस बस मधील एका प्रवाशाच्या मोबाईलवरुन पोलिसांना फोन करण्यात आला आणि पोलीस आल्यानंतर 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं. या तिन्ही तरुणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close