‘त्या’ माथेफिरूने का मारली गौहर खानच्या थोबाडीत ?

December 1, 2014 4:05 PM0 commentsViews:

01 डिसेंबर : सुप्रसिद्ध मॉडेल आणि बिग बॉस फेम अभिनेत्री गौहर खान हिच्या एका म्युजिकल शोच्या दरम्यान स्टेज वर चढून एका युवकाने तिच्या थप्पड लगावली. ‘स्टार प्लस’ या वाहिनीवरील ‘इंडियाज रॉ स्टार’ या कार्यक्रमाच्या चित्रिकरणाच्या वेळी हा सगळा प्रकार घडला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे गौहर चांगलीच गडबडली. थोड्या वेळासाठी नेमके काय झाले हे तीला कळलेच नाही. पण हा युवक गेल्या तीन दिवसांपासून गौहरवर पाळत ठेवून होता. मुस्लिम असून तोकडे कपडे घालते म्हणून त्याने गौहरला थप्पड लगावली.

मोहम्मद अकील मलिक असे त्या 24 वर्षिय युवकाचे नाव आहे. अकिल हा मुंबईतील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. रविवारी मुंबई मधील फिल्म सिटी मधील 9 नंबर स्टुडिओ मध्ये रात्री ‘रॉ स्टार’ या शोचे चित्रीकरण सुरू होते. आरोपी मलिक सुद्धा दोन-तीन दिवस शुटिंग पाहण्यासाठी येत असून गौहरवर देखील नजर ठेऊन होता. रविवारी रात्री 8 च्या दरम्यान चित्रीकरणाच्या वेळी हा युवक आपल्या सीटवरून उठून भर स्टेजवर चढला. पहिल्यांदा त्याने गौहरला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मात्र तीने त्याला ढकलले. त्यानंतर त्या युवकाने गौहरच्या थोबाडीत मारली. त्यावेळी सुरक्षारक्षकांनी लगेच येऊन त्या युवकाला पकडले आणि त्याला पोलिसांच्या हवाली केलं. मुस्लिम असूनही गौहर तोकडे कपडे घालते, अश्लील गाण्यांवर डांस करते, या कारणामुळे आपण तीला मारलं असल्याचं अकीलने सांगितलं. यापुढे गौहरने असे तोकडे कपडे घालू नये, अशी धमकीही त्याने दिली. या प्रकरणी पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर कलम 323 आणि कलम 354 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close