दीपक मानकर अखेर हायकोर्टात हजर

June 30, 2009 1:15 PM0 commentsViews: 3

30 जून, पुणे पुण्यातील लँड माफिया नगरसेवक दीपक मानकर मुंबईहायकोर्टात मंगळवारी दुपारी हजर झाला. त्याच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे. त्याला मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत कोर्टात हजर राहण्याचा आदेश कोर्टानं दिला होता. नातू कुटुंबीयांची जमीन बळकावल्या प्रकरणी मानकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्याला फरार घोषित करण्यात आलं होत. मानकरने पुणे सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो फेटाळल्यानंतर त्याने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मुंबई हायकोर्टाने मानकरला 30 तारखेपर्यंत हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्याची मुदत मंगळवारी संपली. त्यामुळे मानकरला कोर्टानं स्वतः हजर राहण्यास सांगितलं होतं. पण तो दोन वाजेपर्यंत हजर न झाल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केली.

close