काँग्रेसचा हल्लाबोल, ‘मोदी सरकार नाही तर यूटर्न सरकार’

December 1, 2014 6:40 PM1 commentViews:

ajay_makan_u turn01 डिसेंबर : हे मोदी सरकार नसून यूटर्न सरकार आहे असा घणाघात काँग्रेसने केलाय. आज (सोमवारी) काँग्रेसने भाजप सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसने ‘मोदी सरकारचे यूटर्न’ ही पुस्तिकाच आता प्रकाशित केली आहे.

लोकसभेत दिलेल्या आश्वासनांचं काय झालं?, असा सवाल काँग्रेसने विचारलाय. भाजपने सामान्य माणसांना मोठी स्वप्नं दाखवली होती, त्यापैकी एकही आश्वासन मोदी सरकारनं पूर्ण केलेलं नाही अशी टीका काँग्रेसनं केलीये.

या पुस्तिकेत मोदींचे ट्विट आणि बातम्या देण्यात आल्यात. 180 दिवसांत मोदी सरकारने 25 यूटर्न घेतले. हे मोदी सरकार नाही तर ‘यू टर्न सरकार’ आहे अशी टीका काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी केलीये.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Rajesh

    u turn Sarkar, what about black money

close