विनाअनुदानित गॅस सिलेंडर तब्बल 113 रूपयांनी स्वस्त

December 1, 2014 7:17 PM0 commentsViews:

43cylinder-price-hike01 डिसेंबर : पेट्रोल, डिझेलच्या दरकपाती पाठोपाठ आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातही कपात होणार आहे. विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरचे दर तब्बल 113 रुपयांनी कमी होणार आहे. ज्या विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरसाठी तुम्हाला 865 रुपये मोजावे लागते होते आता त्याऐवजी 752 रुपये द्यावे लागणार आहे.

वर्षभर महागाईने होरपळणार्‍या सर्व सामान्य जनतेला वर्षाअखेरीस दिलासा मिळालाय. आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट झालीये. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झालीये. याचाच परिणाम आता घरगुती गॅस सिलेंडरवरही दिसून आलाय. विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आलीये. घसघशीत 113 रुपयांची कपात करण्यात आलीये. घरगुती गॅस सिलेंडरसोबतच जेट इंधनच्या दरातही कपात करण्यात आलीये. जेट इंधनच्या दरात 4.1 टक्के म्हणजे तब्बल 2594.93 रुपये इतकी कपात करण्यात आलीये. गेल्या वर्षभरात ही पाचवी दर कपात आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने अनुदानित गॅस सिलेंडरची मर्यादा 12 इतकी आहे त्यामुळे 12 सिलेंडरच्यानंतर तुम्हाला ही दरकपात फायदेशीर ठरणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close