पुणे : ‘त्या’ 3 महिला बेपत्ता की अपहरण ?

December 1, 2014 7:42 PM1 commentViews:

pune woman01 डिसेंबर : पुण्याजवळील हिंजवडी परिसरातून एकाच दिवशी तीन महिला बेपत्ता झाल्याची घटना घडलीये. मात्र या महिला बेपत्ता झाल्या नसून त्यांचं कुणीतरी अपहरण केल्याची भीती नातेवाइकांनी व्यक्त केलीय या घटनेला आज चार दिवस उलटून गेले. या बाबत हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

शुक्रवारी या हरवलेल्या महिलांपैकी विद्या खाडे आपल्या दोन मैत्रिणी मंगला इंगळे, प्रतिभा हजारे यांच्यासह दवाखान्यात जाण्यासाठी घरा बाहेर पडल्या आणि त्यांनी एका कारमध्ये बसल्या आणि त्या नंतर पुन्हा परत आल्याच नाही. शेवटचा फोन झाला तेव्हा घाबरून मदत मागत असल्याची माहिती तक्रारदार प्रकाश हजारे यांनी दिली आहे. हरवलेल्या या महिलांपैकी विद्या खाडे ही इंन्फोसिसमध्ये सुरक्षा रक्षक असून ती अविवाहित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र 4 दिवसानंतर ही पोलीस तपास शून्य असल्यामुळे परिसरात चिंतेच वातावरण आहे. या प्रकरणी तपास सुरू असून लवकरच या महिलाना शोधून काढण्याचं आश्वासन पोलिसांनी दिली आहे

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • vijay patole

    WHY NO Z PLUS SECURITY TO WEAKER SECTIONS OF THE SOCIETY ???

close